राजापूर : रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील गोठिवरे गावातील जि.प.शाळा १०७ वर्षाची आहे. शिक्षकांच्या बदली सत्रामुळे येथील शिक्षकांची बदली अन्य ठिकाणी झाली.
गोठिवरे जि.प.शाळांमध्ये नव्याने नेमणूक झालेल्या महिला शिक्षक शनिवार, दिनांक १७ जून २०२३ रोजी एक दिवस हजर झाल्या परंतु त्यानंतर त्या आल्या नाहीत. गोठिवरे ग्रामविकास मंडळाचे सचिव निलेश हळदणकर यांनी याबाबत लेखी निवेदन गट शिक्षण अधिकारी, राजापूर जि.रत्नागिरी यांना २२ जून २०२३ रोजी प्रत्यक्ष भेटून निवेदन देऊन गोठिवरे जि.प.शाळांमध्ये कायम स्वरूपी शिक्षक द्यावे, अशी विनंती आहे.
परंतु पंधरा दिवस होऊन गेले तरी शाळेला शिक्षक मिळाले नाही. शाळेत पहिली ते पाचवी पर्यंतचे वर्ग आहेत. पट संख्या १२ आहे. दरम्यान,विद्यार्थ्यांना स्काॅलरशीप परिक्षा, नवदोय परिक्षा,अन्य परिक्षांचे सञ सुरू होईल परंतु विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी शिक्षक नाहीत त्यामुळे विद्यार्थी व पालक चिंताग्रस्त झाले आहेत. शिक्षकांना शिकवण्या व्यतिरिक्त शासकीय अन्य कामेही करावी लागतात तेव्हा वर्ग अर्धावर सोडून किंवा शाळा बंद ठेवून जावे लागते अशावेळी विद्धार्थांचे शैक्षणिक नुकसान होते. म्हणून दोन शिक्षक द्यावेत. शाळेत लवकरात लवकर शिक्षकांची नेमणूक करावी पंधरा दिवस होऊन गेले तरी शिक्षक नेमले नाहीत म्हणून गोठिवरे ग्रामविकास मंडळाचे सचिव निलेश हळदणकर यांनी विद्धार्थांसह पालक व गोठिवरे मधील ग्रामस्थ यांना घेऊन गट शिक्षण अधिकार राजापूर यांच्या कार्यालयावर मोर्चा घेऊन जाण्याचा निर्धार केला आहे.





