Home Uncategorized सातार्डा येथे लोखंडी साकवावर झाड पडून नुकसान | साकव तुटला

सातार्डा येथे लोखंडी साकवावर झाड पडून नुकसान | साकव तुटला

39

सावंतवाडी : सातार्डा येथे झाड पडून लोखंडी साकव तुटल्यामुळे पलीकडे असणाऱ्या बारा घरांचा संपर्क तुटला असून 50 ते 60 ग्रामस्थांचा जाण्या येण्याचा मार्ग बंद झाला आहे. त्यामुळे त्या ठिकाणी राहणाऱ्या विद्यार्थी व कामानिमित्त बाहेर जाणाऱ्या नोकरदारांची गैरसोय झाली आहे. याबाबतची माहिती मिळताच त्या ठिकाणी महसूलचे पथक दाखल झाले. पंचनामा करण्यात आला आहे. संबंधित लोकांची पर्यायी सोय करण्यासंदर्भात प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत. याबाबतची माहिती तहसीलदार श्रीधर पाटील यांनी दिली.