बांदा : सावंतवाडी संस्थानाचे राजे पुण्यश्लोक बापूसाहेब महाराज यांना जनतेविषयी विशेष कळवळा होता. त्यांनी शेतकऱ्यांसाठी व शैक्षणिक विकासासाठी विविध योजना अमलात आणल्या. म्हणूनच त्यांना लोकराजा म्हणून मान्यता होती. महात्मा गांधी यांनी सावंतवाडी संस्थानाचा रामराज्य असा गौरवपूर्ण उल्लेख केला होता. त्यांच्या विचारांना आचरणात आणणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल असे प्रतिपादन नट वाचनालयचे उपाध्यक्ष सुभाष मोर्ये यांनी येथे केले.
येथील नट वाचनालयात पुण्यश्लोक बापूसाहेब महाराज यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. वाचनालायचे अध्यक्ष एस. आर सावंत यांच्या हस्ते त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी वाचनालयचे कार्यवाह राकेश केसरकर, सहकार्यवाह हेमंत मोर्ये, संचालक जगन्नाथ सातोसकर, शंकर नार्वेकर, निलेश मोरजकर, संचालिका स्वप्नीता सावंत, अंकुश माजगावकर, श्री आगा, श्री भिडे, ग्रंथपाल प्रमिला नाईक-मोरजकर, अमिता परब आदीसह वाचक उपस्थित होते.
यावेळी अच्युत गोडबोले यांच्या पुस्तकांचे प्रदर्शन मांडण्यात आले होते. आभार राकेश केसरकर यांनी मानले.





