सावंतवाडी : मिलाग्रीस प्रशालेमध्ये गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली.आपल्या गुरुंबद्दल कतज्ञता व्यक्त करण्यासाठी या खास कार्यक्रमाचे आयोजन केले होते.प्रशालेची विद्यर्थीनी कु.रितीशा मोर्ये हिने अतिशय मोजक्या परंतु सुंदर शब्दात गुरुंबद्दलची कतज्ञता व्यक्त केली. विद्यार्थ्यांनी प्रशालेचे मुख्याध्यापक फादर रिचर्ड सालढाणा, उपमुख्याध्यापिका सिस्टर मेबल, पर्यवेक्षिका मेघना राऊळ व सर्व शिक्षकांना शुभेच्छापत्र देऊन गुरुपौर्णिमेच्या प्रेममय शुभेच्छा दिल्या.
प्रशालेचे मुख्याध्यापक फादर रिचर्ड सालढाणा यांनी गुरुंचे आपल्या जीवनात असलेले महत्व सांगत विद्यार्थ्यांमध्ये आपल्या शिक्षकांविषयी आदर व प्रेम कायम राहावे अशी अपेक्षा व्यक्त केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक नीना फर्नांडिस या विद्यार्थीनीने केले तर आभार निलेश राऊळ या विद्यार्थ्याने मानले. अशा प्रकारे हा कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला.





