कणकवली : पाऊस सुरू झाल्यापासून आजपर्यंत जोरदार पाऊस कोसळत आहे. यात पावसाचा कालपासून जोर वाढला असून मुंबई वेधशाळा हवामान अंदाज खात्याने सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा, रायगड, मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. याच पार्श्वभूमीवर सतर्क राहण्याचे आवाहन देखील करण्यात आले आहे.





