कणकवली : शहरातील उड्डाणपुलाच्या बाजुच्याच सव्र्हस रोडने घरी जाणाऱ्या अनंत विठ्ठल मुळये (७५) यांना शिवाजीनगरकडे मोटरसायकलने जाणाऱ्या महेश दशरथ हुले यांनी धडक दिली. त्यामुळे ते रस्त्यावर पडले.
त्यांना उपचारासाठी येथील उपजिल्हा रूग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले. मात्र, उपचाराअंती त्यांचे रात्री १२.३० वा. त्यांचे निधन झाले. रविवारी रात्री ८ वा. हा अपघात झाला. याप्रकरणी सारस्वत बँकेचे सिक्युरिटी गार्ड गुरूदास पाताडे (३५) यांनी पोलिसांत फिर्याद नोंदविली आहे. महेश हुले त्यांच्या शिवाजीनगर येथील घरी चालले होते. सारस्वत बँकेसमोर त्यांच्या मोटरसायकलने (एमएच ०७ एए ३४८३) अनंत मुळये यांना पाठीमागून जोरात धडक दिली. अनंत मुळये हे शिवाजीनगर येथे चालले होते. त्यांना किरकोळ दुखापत झाल्याचे प्रथमदर्शनी जाणवत होते. अपघाताचा जोरदार आवाज ऐकू येताच नगारिकांनी घटनास्थळी धाव घेऊन त्यांना उपजिल्हा रूग्णालयात दाखल केले. मध्यरात्री १२.३० वा. च्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी अधिक तपास पोलिस करीत आहेत.





