बांदा : येथिल संत सोहिरोबानाथ आंबिये मठात प्रतिवर्षाप्रमाणे श्री गुरुपौर्णिमा उत्सव मोठ्या उत्साहात व भक्तीमय वातावरणात साजरा झाला. सोमवारी सकाळी नाथांच्या मुळ पादुकांची पुजाअर्चा,अभिषेक,संत सोहिरा चरित्रामृत वाचन आदी कार्यक्रम झाले.सायंकाळी ४ वाजता नाथांचा पालखी प्रदक्षिणा सोहळा झाला. या सोहळ्यात भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मठा भोवती वाजतगाजत पाच प्रदक्षिणा केल्यानंतर पालखीचे मठात आगमन झाले.त्यानंतर आरती करुन तीर्थप्रसाद देण्यात आला.





