देवगड : श्री स्वामी समर्थ मठ हडपीड देवगड प्रतिवर्षाप्रमाणे गुरुपौर्णिमा उत्सव सोमवार दिनांक 3 जुलै 2023 रोजी मोठ्या दिमाखात साजरा करण्यात आला. यानिमित्त मठात विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.पहाटे स्वामी मुर्तीवर अभिषेक,श्री व सौ कदम दाम्पत्यांच्या हस्ते श्री ची पादुका पूजा व अभिषेक वतीने ,गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून श्री स्वामी समर्थ मठाच्या वतीने १ ते ३ जुलै या कालावधी आयोजित केलेल्या सामूहिक गुरुलीलामृत पोथी पारायणाची
सांगता दुपारी १२ वाजता करण्यात आली. या पोथी पारायण कार्यक्रमात ७१ स्वामीभक्त सहभागी झाले होते. दुपारी 12 वाजता महाआरती दर्शन महाप्रसाद भाविकांनी स्वामींच्या दर्शनासाठी व महाप्रसादासाठी गर्दी केली होती. दुपारी ३ वाजता देवगड तालुक्यातील १० वी परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांना मठाच्या वतीने दप्तर भेट देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी श्री स्वामी समर्थ फडफडचे संस्थापक सचिव नंदकुमार पेडणेकर यांना स्वामीरत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल व गाव समिती सचिव यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार मिळाल्याबद्दल मठाच्या वतीने त्यांच्या सत्कार करण्यात आला. यावेळी शिरगाव हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक विजयकुमार कदम, सौ कदम, श्री स्वामी समर्थ हडपिडमठाचे संस्थापक सचिव नंदकुमार पेडणेकर ,अध्यक्ष प्रभाकर राणे,
खजिनदार ज्ञानेश्वर राऊत, विजय राणे,विनोद आईर,दिलीप आईर, प्रकाश जोईल मृत्युंजय मुणगेकर , देवेंद्र सतरकर, झुंजार पेडणेकर, विजय पांचाळ प्रदीप हरमलकर आदी उपस्थित होते.
सायंकाळी ५ वाजता भवानी जंक्शन वारकरी भजन दिंडी दाभोळे राऊतवाडी यांनी सादरीकरण केलेली वारकरी दिंडी सर्वात लक्षवेधी ठरली.





