कणकवली : कणकवली नाथ पै नगर येथील गडनदीवरील रेल्वे ब्रिजखाली गांजा विक्री आणि सेवन करणाऱ्या तिघांना अटक करण्यात आली होती. त्यांची शुक्रवारी पोलिस कोठडी संपल्याने पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले. त्यावेळी त्यांना न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. गडनदी रेल्वे ब्रिजखाली गांजा विक्री आणि सेवन करणाऱ्या दोघांना स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाने मंगळवारी रंगेहात पकडले होते. तसेच त्या दोघांचा अन्य एक साथीदार अंधाराचा फायदा घेऊन घटनास्थळावरून पसार झाला होता. त्याला बुधवारी दुपारी कणकवली बाजारपेठेत फिरताना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. वैभव सीताराम पांगम (२५), स्वप्नील सुरेश कुडतरकर (३०), रामदास तुकाराम पांगम (३०,तिघेही रा. नाटळ) अशी त्या संशयित आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडून ३९ हजार रुपये किंमतीचा १ किलो ३१० ग्रामचा गांजा, एक दुचाकी, २ मोबाईल, दोन चिलीम, वजनकाटा, रोख रक्कम जप्त करण्यात आले होते.





