राज्य उत्पादन शुल्क पथकाची बेकायदेशीर दारू वाहतुकीवर धडक कारवाई…

56

बांदा : सावंतवाडी जि. सिंधुदुर्ग या पथकाने राष्ट्रीय महामार्ग क्र.66, मळगाव पुलावर मळगाव, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग अवैधरित्या परराज्यातील मद्याची वाहतुक करताना महिन्द्रा कंपनीचे स्कॉरपिओ चारचाकी वाहनासह 13, 29,680/- रु. किंमतीचा मुद्देमाल जप्त केला.

दि. 30/06/2023 रोजी मा. श्री. विजय सुर्यवंशी साहेब, आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, महाराष्ट्र राज्य, मा. श्री. सुनिल चव्हाण साहेब संचालक ( अं.व.द.) राज्य उत्पादन शुल्क, महाराष्ट्र राज्य मुंबई, मा. श्री. विजय चिंचाळकर, विभागीय उपआयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, कोल्हापूर विभाग कोल्हापूर, मा. श्री. वैभव वैद्य, साहेब, प्र. अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, सिंधुदुर्ग यांच्या मार्गदर्शनाखाली मिळालेल्या गुप्त बातमीनुसार मध्यरात्री तपासणी नाका इन्सुली येथे गोव्याहून येणाऱ्या संशयीत वाहनांची तपासणी करीत असताना महिन्द्रा कंपनीचे स्कॉरपिओ चारचाकी वाहन क्र. GJ-1-RY 143 वाहन तपासणीसाठी न थांबल्याने त्याचा पाठलाग केला असता सदरचे वाहन राष्ट्रीय महामार्ग क्र.66, मळगाव पुलावर मळगाव, ता. सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग येथे मिळुन आले. त्या ठिकाणी सदर वाहनाची तपासणी केली असता या वाहनामध्ये गोवा बनावटीच्या विदेशी मद्याच्या मॅकडॉल नं 1 व्हिस्कीच्या 180 मि.ली क्षमतेच्या एकुण 1776 बाटल्यांचे 37 बॉक्स अवैध मद्यसाठा मिळून आला. सदर वाहनाचा वाहन चालक रात्रीच्या अंधाराचा फायदा घेवून पसार झाल्याने व आजुबाजुला शोध घेवून देखील मिळून न आल्याने त्यास फरार घोषीत करण्यात आले. सदर गुन्ह्यामध्ये अं. रु.3, 19,680/- किंमतीचे मद्य व अं.रु.10,000/- किंमतीचा एक अॅन्ड्राइड मोबाईल, तसेच रु.10,00,000/- किमतीचे चारचाकी वाहन असा एकुण रु.13,29,680/- किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून महाराष्ट्र दारुबंदी कायदा 1949 अंतर्गत विविध कलमानुसार गुन्हा नोंदविण्यात आला.

सदर कारवाई मा. श्री. वैभव वैद्य, साहेब, प्र. अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, सिंधुदुर्ग यांच्या

मार्गदर्शनाखाली श्री. संजय मोहिते, निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, तपासणी नाका इन्सुली, श्री. प्रदीप रास्कर दुय्यम निरीक्षक, श्री. गोपाळ राणे, स.दु. नि, श्री. दिपक वायदंडे जवान व श्री. रणजीत शिंदे, जवान नि. वाहन चालक यांनी केली. सदर प्रकरणी पुढील तपास दुय्यम निरीक्षक, तपासणी नाका इन्सुली श्री. प्रदीप रास्कर हे करीत आहेत.