सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक,उच्च माध्यमिक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी पतपेढीच्या अध्यक्षपदी संजय वेतुरेकर तर उपाध्यक्षपदी सुमेधा नाईक -धुरी

98

सावंतवाडी : आज माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी पतपेढी सिंधुदुर्गची अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवडणूक पार पडली.
या निवडणुकीमध्ये सर्व समावेशक पॅनलचे 11 संचालक निवडून आलेले होते तर आदर्श सहकारी पॅनलचे चार संचालक निवडून आलेले होते.
यामध्ये निवडणूक निर्णय अधिकारी यु. एम. यादव यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक प्रक्रिया पार पडली.
अध्यक्षपदासाठी संजय वेतुरेकर यांना 11 मते तर संदीप कदम यांना चार मते मिळाली तसेच उपाध्यक्ष पदासाठी डॉ. सुमेधा नाईक यांना 11 मते तर मारुती पुजारी यांना चार मते मिळाली.
अध्यक्ष म्हणून श्री. संजय वेतुरेकर आणि उपाध्यक्ष म्हणून डॉ. सुमेधा नाईक यांचे उपस्थित संचालक तसेच दोन्ही पॅनेलच्या संचालकांनी अभिनंदन केले. यावेळी शिक्षक भारतीचे कार्याध्यक्ष प्रशांत आडेलकर, सुरेश चौकेकर, सुनील जाधव, गवळी सर, अशोक राणे, वारंगे सर, तिवरेकर सर, शिंदे सर, शिक्षकेतर संघटनांचे उपाध्यक्ष जगदीश सावंत इत्यादी उपस्थित होते.