जेईई अॅडव्हान्स’ परीक्षेत बांदा येथील तन्वी बांदेकर सिंधुदुर्ग जिल्ह्यातून प्रथम…

57

बांदा : भारतीय तंत्रज्ञान संस्थेतील (आयआयटी) प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या ‘जेईई अॅडव्हान्स’ परीक्षेत बांदा येथील तन्वी प्रशांत बांदेकर या विद्यार्थिनीने सिंधुदुर्ग जिल्ह्यातून प्रथम, तर संपूर्ण देशातून १५७३ वी रँक मिळवून उल्लेखनीय यश मिळविले. या परीक्षेसाठी देशभरातून ४३ हजार ७७३ विद्यार्थी पात्र ठरले. इंजिनिअरिंग क्षेत्रातील ही भारतातील सर्वांत प्रतिष्ठित व कठीण समजली जाणारी परीक्षा आहे. या यशामुळे आयआयटीसाठी भारतातील कोणत्याही नामांकित संस्थेत प्रवेश मिळणार आहे. तन्वी ही बांदा ग्रामपंचाय सदस्य प्रशांत बांदेकर आणि न्यू इंग्लिश स्कूल भेडशी च्या शिक्षिका
संज्योत बांदेकर यांची कन्या असून तीच्या या उल्लेखनीय यशाबाबत सर्वत्र तीचे कौतुक होत आहे