एसटी बँक निवडणुकीत जनसंघ सदावर्ते पॅनलची प्रचारात मुसंडी…!

57

सावंतवाडी : एसटीच्या एसटी को-ऑपरेटिव्ह बँक निवडणुकीत एसटी कष्टकरी जनसंघ सदावर्तेच्या पॅनलने प्रचारात जोरदार मुसंडी घेत प्रत्येक कर्मचाऱ्यापर्यंत पोहोचत आपला जोरदार प्रचार सुरू केला आहे.

एसटी कर्मचाऱ्यांसाठी एसटी को-ऑपरेटिव बँकही कार्यरत असून त्याची निवडणूक जाहीर झाली असून एसटी कष्टकरी जनसंघ अर्थातच सदावर्ते पॅनेल यांच्या सर्व उमेदवारांनी प्रचारात जोरदार मुसंडी मारलेली आहे.आज प्रचारासाठी एसटी कष्टकरी जनसंघ सदावर्ते पॅनलचे उमेदवार सावंतवाडी मध्ये दाखल झाले असता त्यांनी आपल्याच पॅनलचा विजय होणार असा विश्वास व्यक्त करत प्रत्येक कर्मचाऱ्यांचे गाठी भेटीवर जास्त भर दिला असल्याचे त्यांनी माहिती दिली.आपले पॅनेल निवडून आल्यावर आम्ही एसटीच्या कर्मचाऱ्यांसाठी विविध योजना सुरू करणार असून यामध्ये कष्टकऱ्यांच्या वारसांना सरळ सेवा भरती मध्ये आरक्षण देऊ,बिगर जामीनदार कर्ज,कर्मचाऱ्यांना क्रेडिट कार्ड,सहकार भांडार,कर्मचाऱ्यांसाठी घर बांधणी अशा विविध योजना या पॅनलच्या माध्यमातून देणार असल्याचे मत या ठिकाणी व्यक्त करण्यात आले.यावेळी गणेश शिरकर,अमित रावले,बाबू मोहोदेकर, दत्ता पाताडे,महेश राणे,सुधीर नागवेकर,काका खोत,अमोल शिवलकर,उदय पाटील आदी उपस्थित होते.