देवगड : महाराष्ट्र राज्याचे माजी पर्यावरण पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून बुधवार १४ जून २०२३ रोजी सकाळी ९ वाजता भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन देवगड येथील इंद्रप्रस्थ हॉल येथे आयोजित करण्यात आले आहे. या रक्तदान शिबिरात सहभागी होणाऱ्या रक्तदात्यांना आकर्षक भेटवस्तू देण्यात येणार आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी या रक्तदान शिबिरामध्ये सहभाग नोंदवावा असे आवाहन देवगड तालुका उबाठा युवासेना तालुकाप्रमुख गणेश गावकर व फरीद काझी यांनी केले आहे.
Home ब्रेकिंग न्यूज माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन…!





