सावंतवाडी : सावंतवाडी तहसीलदार पदी श्रीधर पाटील यांची नेमणूक झाली आहे.
सावंतवाडी तहसीलदार पदी अरुण उंडे हे 6 महिन्याच्या तात्पुरत्या प्रशिक्षण कामगिरी कालावधी करीता कार्यरत होते.उंडे यांचा प्रशिक्षण कालावधी संपल्याने रिक्त असलेल्या सावंतवाडी तहसीलदार पदी श्रीधर पाटील यांची नेमणूक करण्यात आली आहे.पाटील यांनी यापूर्वी काही महिने प्रभारी सावंतवाडी तहसीलदार म्हणून काम पाहिले होते.





