सावंतवाडी : होडावडा येथील भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी गावातील विजेच्या विविध समस्यांबाबत वीज अधिकाऱ्यांना निवेदन देऊन तात्काळ समस्या सोडवण्याची मागणी केली आहे.
होडावडा गावात विजेच्या अनेक समस्यांनी ग्रामस्थ हैराण झाले आहेत.होडावडा बाजारपेठेत वीजेचा दाब कमी होत असल्याने तेथे 200 kv चा नवीन ट्रान्सफॉर्मर बसवणे, तसेच होडावडा गावामध्ये वारंवार वीज खंडीत होत असल्याने त्याची तातडीने दुरुस्ती करून सुरळीत वीज पुरवठा करणे अशा मागणीचे निवेदन महावितरण उपविभाग वेंगुर्ल्याचे कनिष्ठ अभियंता कोठावळे यांना होडावडा भाजपच्या वतीने देण्यात आले.यावेळी राजबा सावंत, मनोहर नाईक, प्रसाद परब, प्रसाद दळवी, विवेक साळगावकर, नाना परब, संतोष खानोलकर आदी उपस्थित होते.





