न्यायालयाच्या परिसरात दारू पिऊन धिंगाना | दोघांविरुद्ध देवगड पोलिसांची कारवाई ..!

95

देवगड : देवगड कोर्टाच्या आवारात दारू पिऊन धिंगाणा घालणाऱ्या दोघांना देवगड पोलिसांनी ताब्यात घेऊन कारवाई केली आहे. ही घटना सोमवार दिनांक 29 मे रोजी दुपारी 2:45 वाजता घडली याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संतोष वामन बाणे, राहणार मोंड तळीवाडी व नितीन दत्तात्रय घाडी राहणार वाडा परबवाडी या दोघांनी सोमवार दिनांक 29 मे रोजी दुपारी 2:45 च्या सुमारास दारू पिऊन देवगड न्यायालयाच्या परिसरात धिंगाणा घातला. मद्यप्राशन करून गैरवर्तन केले. याबाबत पोलीस कॉन्स्टेबल स्वप्निल भोवर यांनी दिलेल्या फिर्यादी वरून पोलिसांनी दोघांविरुद्ध त्यांना ताब्यात घेऊन महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम 85 नुसार ही कारवाई केली आहे.