नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना जीवे मारण्याची धमकी आलेली आहे. त्यामुळे नितीन गडकरी यांचे संरक्षण वाढविण्यात आले आहे. नितीन गडकरी यांचे नागपूरमध्ये ऑरेंज सिटी रुग्णालयाजवळ जनसंपर्क कार्यालय आहे. त्या ठिकाणी फोन कॉल करून ही धमकी देण्यात आली .साडेअकराच्या सुमारास दोन वेळेला आणि त्याच्यानंतर पुन्हा 12:32 ला धमकीचे कॉल आले. अशी माहिती कार्यालयातील कर्मचाऱ्यांकडून मिळालेली आहे. त्याप्रमाणे दाऊद असा शब्द त्या कॉलमध्ये उच्चारण्यात आला. काही खंडणी आम्हाला द्या अशा पद्धतीचा आशय त्या कॉलचा होता. जर खंडणी दिली नाही तर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना जीवे मारू अशा पद्धतीने धमकी देण्यात आली.
जनसंपर्क कार्यालयाने त्याची माहिती नागपूरच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना दिली. नागपूरच्या सायबर सेलला ही माहिती देण्यात आलेली आहे. पोलिसांकडून अधिक तपास केला जात आहे. सायबर टीम सुद्धा तपास करत आहे.
मात्र ज्या पद्धतीने ही धमकी देण्यात आलेली आहे नक्कीच एक गंभीर घटना आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे सुद्धा आज नागपूर येथे असल्याची माहिती आहे. सध्या ते एका कार्यक्रमांमध्ये आहेत. त्या ठिकाणी पण पोलिसांनी त्यांची सुरक्षा चोख ठेवण्यात आली आहे. मात्र हे धमकीचे कॉल कोणी केलेले आहेत? याचा सध्या तपास केला जात आहे.





