कणकवली : घरची आर्थिक स्थिती बेताची, त्यात वाढत्या कर्जाचं ओझं, जोडीला दारूच व्यसन यातून आलेल्या नैराश्यातून शहरातील बांधकरवाडी येथील भाड्याच्या रहात्या घरात अजय अभिमन्यू मोहिते (४३) या युवकाने सिलिंग फॅनला गळफास घेत आत्महत्या केली. आत्महत्येचा प्रकार सोमवारी दुपारी २.३० वा. च्या सुमारास घडला.
मूळ पिसकामते येथील अजय मोहिते पूर्वी मिळेल ते मोलमजुरीची काम करीत होता. काही दिवस त्याने भाडेतत्वावर पानस्टॉल चालविला होता. अलिकडे तेही काम तो करीत नव्हता. त्याची पत्नी मोलमजुरीची काम करून उदरनिर्वाह करीत होती. सोमवारी ती अशी कामाला गेली असता अजय याने हॉलमधील सिलिंग फॅनला गळफास घेत आतमहत्या केली. याबाबतची खबर त्यांचा मोठा मुलगा साईश अजय मोहिते याने पोलिसात दिली आहे. अजय मोहिते याच्या पश्चात पत्नी व तीन मुलगे असा परिवार आहे.





