हरकुळ बुद्रुक येथे रिक्षाला अपघात | चालक जखमी

हरकुळ इंजिनिअरिंग कॉलेज जवळ अपघातांचे सत्र सुरूच ?

कणकवली : तालुक्यातील हरकुळ बुद्रुक येथील इंजिनिअरिंग कॉलेज नजिक असलेल्या तीव्र वळणावर शनिवारी दुपारी २:१५ वा. च्या सुमारास एका रिक्षाचा अपघात झाला.

अपघाताची तीव्रता एवढी भीषण होती की रिक्षा थेट रस्त्याच्या उजव्या बाजूला गटाराच्या बाजूला असलेल्या झाडाझुडुपांमध्ये शिरली. या अपघातात रिक्षा चालक गंभीर जखमी झाला असून मोठ्या प्रमाणात नका- तोंडाला दुखापत झाल्याची माहिती समोर येत आहे. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली व मदतकार्य सुरू केले.

मात्र कणकवली – नरडवे रस्त्यावर मागील काही दिवसांपासून अपघातांचे सत्र कायम सुरू राहीले असून नेमके वारंवार अपघात कसे घडतात याबाबत उलट सुलट चर्चा रंगू लागल्या आहेत.