सावंतवाडी भूमी अभिलेख कार्यालयातील उपअधिक्षक प्रियदा साकोरे यांची बदली…!

सावंतवाडी : सावंतवाडी उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयातील उपअधिक्षक प्रियदा नामदेव साकोरे यांची महाराष्ट्र राज्याच्या जमाबंदी आयुक्त व संचालक भूमी अभिलेख ( म. राज्य) पुणे यांचे कार्यालयात कार्यालय अधीक्षक या पदावर बदली झालेली आहे. श्रीम. प्रियदा साकोरे या योग्य नियोजन व पारदर्शक कारभार यामुळे नागरिकांत लोकप्रिय होत्या.

त्यांच्या कार्य कालावधीत त्यांनी अपुरा कर्मचारी वर्ग असतानाही प्रलंबित मोजणी प्रकरणांचा योग्य पद्धतीने निपटारा करून नागरिकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. सावंतवाडी तालुक्यातील गावठाण मोजनिमध्येही त्यांचे मोलाचे सहकार्य होते. तसेच मिळकत पत्रिकांचे संगणकीकरण, मिळकत पत्रिका व सात बारा यांचे मॅपिंग काम तसेच भूमी अभिलेख विभाग अधूनिकिकरणामध्ये त्यांचे योगदान मोलाचे होते. एक महिला अधिकारी असून त्यांनी सावंतवाडी बरोबर इतर तालुक्यांचाही पदभार योग्य रीतीने सांभाळला होता. त्याबाबत वरिष्ठांनी ही त्यांच्या कामाचे कौतुक केलेले होते. श्रीम. साकोरे ह्या कर्मचारी व नागरिकांमध्ये लोकप्रिय अधिकारी होत्या.