सावंतवाडी निरवडे मार्गावरील हिलसाइड ढाबा नजीक डंपरने दुचाकी ला धडक देत अपघात झाला आहे.या अपघातात दोन युवती व एक युवक गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे.जखमी मध्ये मीनाक्षी माणगावकर,तन्वी माणगावकर,शंकर म्हाडगुत यांचा समावेश आहे.सदरचे जखमी हे आरोस दांडेली येथील असून जखमी तन्वी ही आताच पोलीस भरतीत पात्र ठरली होती. जखमी दोन्ही युवतींच्या पायाला गंभीर दुखापत झाली असून युवकाच्या डोक्याला दुखापत झाली आहे.घटनास्थळावरून पलायन करणाऱ्या संशयित डंपरला मळेवाड येथील ग्रामस्थांनी रोखून धरला.जखमींना आधी उपचारासाठी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असता अधिक उपचारासाठी गोवा बांबूळी येथे हलविण्यात आले आहे .डंपरच्या एका बाजूची हेड लाइट बंद असल्याने हा अपघात झाला आहे.




