कणकवली : मुंबईचे माजी महापौर विश्वनाथ म्हाडेश्वर यांचे आज निधन झाले. त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी सांताकृझ पूर्व, पटेल नगर सर्विस रोड येथील राजे संभाजी विद्यालयात दुपारी २ वा. ठेवण्यात येणार आहे. त्यांनंतर दुपारी ४ वा. अंत्ययात्रा काढण्यात येणार आहे. विश्वनाथ म्हाडेश्वर हे मूळ सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुसबे – पोखरण येथील होते.
मुंबई महानगरपालिकेच्या महापौरपदी ते विराजमान झाले होते. तसेच आमदारकीची निवडणूक देखील त्यांनी लढवली होती. वैश्य, वाणी समाजाला जात पडताळणीच्या बाबतीत कायदेशीर लढ्यात त्यांनी काही वर्षांपूर्वी महत्त्वाची व मोठी भूमिका बजावली होती.





