कुडाळ पोलिसांच्या वतीने रस्ता सुरक्षा अभियान…!

कुडाळ : सतत होणाऱ्या अपघाताना आळा घालण्यासाठी कुडाळ पोलिसांच्या वतीने रस्ता सुरक्षा अभियान २०२३ ही मोहीम राबविण्यात येत आहे. त्यामध्ये वाहन चालविताना हेल्मेटचा व सीट बेल्टचा वापर करा. रस्त्यावरती चुकीच्या पद्धतीने ओव्हरटेक करू नका. वाहन चालवताना मोबाईलवर बोलणे टाळा, अमली पदार्थ सेवन करून वाहन चालू नका, वेगावर नियंत्रण ठेवा, अपघात टाळा, नुकसान टाळा आणि वेळच वाचवा.

अश्या प्रकारचे आवाहन कुडाळ पोलीस निरीक्षक शंकर चिंदरकर यांच्या मार्गदर्शनाखाली सदर मोहीम आज रोजी संत राऊळ महाराज चौक ह्या ठिकाणी राबविण्यात आली.त्यावेळी उपस्थित सहाय्यक उप पोलीस निरीक्षक सागर शिंदे,ट्रॅफिक पोलीस श्याम भगत,समीर बांदेकर,सुबोध मळगावकर आदी उपस्थित होते.