सतरा वर्षीय युवक बुडाला | कणकवली तालुक्यातील वरवडे संगम वरील घटना…

148

कणकवली : तालुक्यातील वरवडे संगम येथील गडनदी पात्रातील मोठया खडकावर बसून तीन युवक मोबाईल मधून सेल्फी घेत होते. अचानक त्यातील १७ वर्षीय एका युवकाचा पाय घसरल्याने तो खोल पाण्यात पडून बुडाला आहे. व रात्री उशिरापर्यंत पोलिस तसेच नागरिकांनी शोध घेऊनही तो सापडला नव्हता. पोलीस प्रशासनाने काळोख पडल्याने मोहीम थांबवली आहे. आज सकाळी पुन्हा शोध मोहीम घेण्यात येणार असल्याचे समजते. कणकवली येथिल एका नातलगाकडे दोन युवक केरळ येथून आले होते. त्या नातलगाचा मुलगा तसेच ते दोघे युवक असे तिघे बुधवारी सायंकाळी वरवडे नदी संगम येथे गेले. गडनदी पात्रातील एका मोठ्या खडकावर ते तिघे बसून सनसेटचे फोटो घेत होते. तसेच मोबाईल मधून सेल्फी घेत होते.

एवढ्यात त्या तिघांपैकी कणकवली येथील नातलगाच्या मुलाचा पाय घसरला. त्यामुळे तो खोल पाण्यात बुडाला. शोध घेऊनही तो न सापडल्याने अखेर कणकवली पोलिसांना कळविण्यात आले. पोलिस निरीक्षक अनिल जाधव पथकासह घटनास्थळी दाखल झाले. तेथील नागरिकांच्या मदतीने त्या युवकाला शोधण्याची मोहीम राबविण्यात आली. मात्र, रात्री उशिरापर्यंत तो युवक सापडला नव्हता. दरम्यान, नदीपात्रात बुडालेल्या युवकाचे नाव समजू शकलेले नाही.