निगुडे गावात आगळवेगळं झेंडावंदन | सरपंच लक्ष्मण निगुडकर यांची संकल्पना

बांदा : निगुडे गावात महाराष्ट्र दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. निगुडे सरपंच लक्ष्मण निगुडकर यांच्या संकल्पनेतुन आगळावेगळा महाराष्ट्र दिन साजरा केला गेला. निगुडे गावातील ज्येष्ठ नागरिक श्रीमान बाबाजी गोविंद गावडे वय 91 वर्ष हे एक सामान्य शेतकरी असून, वारकरी संप्रदायातील आहेत. श्री.गावडे यांनी अद्याप पर्यंत कोणतीही निवडणूक लढवली नाही किंवा ते कोणत्याही राजकीय पक्षाचे कार्यकर्ते, पुढारी किंवा नेते नाहीत असे असताना सरपंच निगुडकर यांनी निगुडे गावातील ज्येष्ठ नागरिक गावडे यांना सन्मान देऊन त्यांच्या हस्ते सकाळी निगुडे ग्रामपंचायत कार्यालय इथं ध्वजारोहण करण्यात आलं.