आज मळेवाड इथ “मायासंग्राम” या नाट्यप्रयोगाच आयोजन…

97

सावंतवाडी : आज मळेवाड येथे मायासंग्राम हा दशावतारी नाट्य प्रयोग संपन्न होणार आहे.
ग्रामपंचायत मळेवाड कोंडुरे व युवा मित्र मंडळ मळेवाड कोंडुरे यांच्या वतीने 30 एप्रिल ते 4 मे या कालावधीतभव्य सांस्कृतिक पर्यटन महोत्सव 2023 चे आयोजन करण्यात आलेले आहे.आजच्या पहिल्या दिवशी सकाळी श्री गणेश मूर्तीवर अभिषेक त्याचप्रमाणे श्री सत्यनारायण महापूजा संपन्न झाली.यानिमित्त आज रात्री आठ वाजता हेळेकर दशावतार नाट्य मंडळाचा मायासंग्राम हा नाट्यप्रयोग मळेवाड जकातनाका येथील श्री गणपती मंदिर रंगमंचावर संपन्न होणार आहे.तरी सर्व रसिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.