सिंधुदुर्ग : खासदार श्री. विनायक राऊत यांनी गेल्या 7 वर्षाच्या कारकिर्दी मध्ये पहिल्यांदा सिंधुदुर्ग जिल्हयात 104 BSNL टॉवर मंजूर करुन घेतले होते. त्यापैकी बऱ्याच प्रमाणात कामे पुर्ण होवून मोबाईल टॉवर सेवेत कार्यरत आहेत.
सन 2022 मध्ये नव्याने 84 BSNL टॉवर मंजूर करुन घेतले होते. तर आता सिंधुदुर्ग जिल्हयातील ग्रामीण भागासाठी CAT 1 मधून 50 तर CAT 2 मधून 101 व 9 अतिजूने व नव्याने असे मिळून 160 BSNL मोबाईल टॉवर मंजूर करुन घेतले असून त्यांची मंजूर यादी शासनाकडून जाहिर करण्यात आली आहे. मा. खा. श्री. विनायक राऊत यांनी जिल्हयात आजपर्यंत एकूण 348 BSNL मोबाईल टॉवर मंजूर करुन घेवून सिंधुदुर्ग जिल्हयाचा सर्व ग्रामीण भाग जोडण्याचे काम केले आहे.





