वाहतुकीस अडथळा निर्माण केल्या प्रकरणी तीन वाहन चालकांवर देवगड पोलिसांची कारवाई…

99

देवगड : देवगड जामसंडे शहरांमध्ये वाहन चालक दुर्तफा वाहने उभी करून ठेवत असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होण्याचे प्रकार वारंवार घडत असून शुक्रवारी याबाबत देवगड पोलिसांनी कडक कारवाईची मोहीम हाती घेऊन वाहतुकीस अडथळा निर्माण केल्याप्रकरणी तीन वाहन चालकांवर गुन्हे दाखल केले आहे. देवगड पोलीस स्टेशनचे पोलीस कॉन्स्टेबल निलेश पाटील यांनी देवगड शहरात वाहतुकीस अडथळा होईल अशा स्थितीत वाहने उभी केल्याप्रकरणी शुक्रवारी तीन वाहन चालकावर कारवाई केली आहे . ही वाहने देवगड बाजारपेठ ,भाजी मार्केट या ठिकाणी इतर वाहनांना वाहतुकीस अडचणी निर्माण करतील अशा पद्धतीने वाहने उभी ठेवणाऱ्या वाहन चालकांवर ही कारवाई केली आहे. शुक्रवारी देवगड बाजारपेठ येथील विठ्ठलवाडी नाका येथे दुपारी ३ वाजता डंपर चालक प्रयोग कुमार रामेश्वर महातो (२३) झारखंड सध्या राहणार तळेबाजार, यांनी रस्त्यावर वाहतूक अडचणी निर्माण केले निर्माण होईल अशा स्थितीत डंपर उभा करून ठेवला होता तसेच त्याच दरम्यान डंपर चालक जितेंद्र सत्यवान धनावडे व ३६ जगतापवाडी यांनी वाहतुकीस अडचणी अशा स्थितीत डंपर उभा केलेला होता त्याच दिवशी सकाळी नऊ तीस वाजता आयशर टेम्पोचे मालक मोहम्मद जाफर नालबंद वय ३० कलमठ कणकवली यांनी आयशर टेम्पो जुन्या भाजी मार्केट समोर उभा केल्याने वाहतुकीचा अडथळा निर्माण झाल्या प्रकरणी या तिन्ही वाहन चालकांवर पोलीस कॉन्स्टेबल निलेश पाटील यांनी भादवी कलम २८३ अन्वये गुन्हा दाखल केला आहे