जळगाव : गेले काही दिवस जळगाव जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पाऊस पडतो आहे .
अवकाळी आलेल्या जोराच्या वादळामुळे उभा कंटेनर पलटी झाल्याने आडोश्याला उभे असलेल्या दोन जण जागीच ठार झाले तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना जळगाव तालुक्यातील चिंचोली गावाजवळील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या बांधकामाच्या ठिकाणी घडली. जखमीस जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे. भोला श्रीकुसूम पटेल रा. सानीकावा जि. सिवान बिहार आणि चंद्रकांत वाभळे (वय-५२) रा.चाळीसगाव ह.मु. पुणे असे मयत झालेल्या व्यक्तीचे नावे आहे.





