राज्यस्तरीय शाळा पूर्वतयारी मेळावा रद्द…

92

बांदा : राज्य शासनाच्या वतीने आज जिल्हा परिषद केंद्र शाळा बांदा नं. १ येथे आयोजित करण्यात आलेला राज्यस्तरीय शाळा पूर्व तयारी मेळावा रद्द करण्यात आला आहे. पंजाबचे माजी मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल यांचे निधन झाल्याने केंद्र सरकारने तीन दिवस राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे. त्यामुळे कार्यक्रम रद्द करण्यात आला असून सदर मेळावा सोमवार दिनांक १ मे रोजी सायंकाळी ४ वाजता आयोजित करण्यात आल्याची माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी महेश धोत्रे यांनी दिली आहे.