ठाणे : मालवण दांडी समुद्र किनाऱ्यावर दि. २७ ते ३० एप्रिल रोजी गाबीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यांचे औचित्य साधून अखिल भारतीय गाबीत समाज महासंघाच्या वतीने तयार करण्यात आलेल्या ” गाबीत समाजाचा इतिहास ” या पुस्तकाचे प्रकाशन ठाणे येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी आमदार रवींद्र फाटक, अखिल भारतीय गाबीत समाज महासंघाचे अध्यक्ष तथा माजी आमदार परशुराम उपरकर, कार्याध्यक्ष तथा कवी दिगंबर गांवकर, सरचिटणीस वासुदेव मोंडकर, खजिनदार नारायण आडकर, गाबीत समाज महाराष्ट्र अध्यक्ष सुजय धुरत, सरचिटणीस बाळा मणचेकर आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मालवण येथे आयोजित करण्यात आलेल्या गाबीत महोत्सवास शुभेच्छा व्यक्त करून समाजाच्या पाठीशी असून आपणास सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही दिली. माजी आमदार परशुराम उपरकर यांनी ” गाबीत समाजाचा इतिहास ‘ हे पुस्तक नव्या स्वरूपात संकलित करीत असताना त्यात अनेक समाजबांधवाकडून तसेच विविध ग्रंथातून गाबीत समाजासंबंधी माहिती नवीन पिढीला ज्ञात व्हावी म्हणून सदर पुस्तक संग्रहीत करण्यात आले आहे असे नमूद केले. हे पुस्तक महोत्सवात समाज बांधवांना उपलब्ध करून दिले जाणार आहे असे वासुदेव मोंडकर यांनी सांगितले.
Home ब्रेकिंग न्यूज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते गाबीत समाजाचा इतिहास ‘ या पुस्तकाचे प्रकाशन…





