सांगली : जत तालुक्यात दरीकोणूर येथे एका महिलेसह मुलीचा गळा आवळून खून केल्याची घटना रविवारी रात्री घडली असून या प्रकरणी तिच्या पतीला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. चारित्र्याच्या संशयावरून हा प्रकार घडला असल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.
दरीकोणूर गावी उमदी रस्त्यावर असलेल्या बेळुंखे वस्तीवर प्रियांका बिरूदेव बेळुंखे (वय ३२) आणि मोहिनी बिरूदेव बेळुंखे (वय १४) या दोघींचा गळा आवळून खून केल्याची घटना रविवारी रात्री घडली. या प्रकरणी बिरूदेव बेळुंखी याला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.





