कणकवली पंचायत समिती येथे एकात्मिक कुक्कुट विकास कार्यक्रम अंतर्गत एक दिवसीय कुक्कुटपिल्लांचे वाटप.!

147

कणकवली : येथे एकात्मिक कुक्कुट विकास कार्यक्रम अंतर्गत तसेच जिल्हा परिषद सेस अंतर्गत महिला सबलीकरणासाठी एक दिवसीय ५० कुक्कुटपिल्ले कुक्कुटपालनकरिता एक दिवसीय पन्नास व शंभर पिल्लांचे कणकवली पंचायत समिती येथे वाटप करण्यात आले. दरम्यान या योजनेचा एकूण २८ लाभार्थ्यांनी लाभ घेतला. यात शंभर पिल्लांचा पाच लाभार्थ्यांनी व पन्नास पिल्लांचा तेवीस लाभार्थ्यांनी लाभ घेतला.

सदर योजनेतील कुक्कुट पिल्लांचे गटविकास अधिकारी अरुण चव्हाण, सहाय्यक गटविकास अधिकारी सूर्यकांत वारंग, पशुसंवर्धन सहायक आयुक्त श्रीमती ज्योति खैरे, सहाय्यक पशुधन विकास अधिकारी ए. डी. पालकर, पशुधन पर्यवेक्षक डी. आर. चव्हाण, पशुधन पर्यवेक्षक ए. जी. साटम, पंचायत समिती पशुधन पर्यवेक्षक श्रीमती मानसी राणे, पत्रकार मयुर ठाकूर यांच्या उपस्थितीत कणकवली पंचायत समिती येथे वाटप करण्यात आले