बस अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्र्यांकडून ५ लाखांची मदत जाहीर | जखमींवर शासकीय खर्चाने उपचार

रायगड : जिल्ह्यातील जुना पुणे मुंबई हायवे, शिंगरोबा मंदिराच्या पाठीमागील घाटात झालेल्या अपघातातील जखमींची विचारपूस व प्राथमिक मदत पुरविण्यासाठी उद्योग मंत्री उदय सामंत यांनी कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात भेट दिली.तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एमजीएम रुग्णालय कळंबोली येथील जखमींची विचारपूस केली.
जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर खाजगी बस दरीत कोसळून आज पहाटे झालेल्या भीषण अपघाताबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे.

या अपघातातील मृत आणि त्यांच्या कुटुंबिंयाप्रति सहवेदना प्रकट करुन या दुर्दॅवी घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री सहायता निधीमधून प्रत्येकी ५ लाख रुपयांची मदत मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी जाहीर केली आहे.
अपघाताची माहिती मिळताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रायगडचे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधिक्षकांशी दूरध्वनीवर संपर्क साधून या घटनेची माहिती घेतली. अपघातग्रस्तांना तातडीने मदत करण्याच्या सूचना देतानाच जखमींना शासकीय खर्चाने तात्काळ वैद्यकीय उपचार पुरविण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.

अपघातानंतर तातडीने मदतकार्यात सहभागी झालेल्या हायकर्स आणि आयआरबी टीममधील तरुणांशी मुख्यमंत्र्यांनी चर्चा केली, या संकटसमयी मदतकार्यात तातडीने धावून आल्याबद्दल या टीमच्या सदस्यांचे मुख्यमंत्र्यांनी कौतुक केले.

एमजीएम हॉस्पिटल येथे पाठवण्यात आलेल्या जखमींची नावे
1)आशिष विजय गुरव,19 वर्षे, दहिसर मुंबई.
2) यश अनंत सकपाळ, वय 17 वर्ष, गोरेगाव, मुंबई.
3) जयेश तुकाराम नरळकर, वय 24 वर्षे, कांदिवली, मुंबई.
4) वृषभ रवींद्र कोरमे, वय 14 वर्षे, गोरेगाव, मुंबई.
5) रुचिका सुनील डुमणे, वय 17 वर्षे, गोरेगाव, मुंबई.
6) आशिष विजय गुरव, वय १९ वर्ष, दहिसर, मुंबई
7)ओंकार जितेंद्र पवार, वय 25 वर्षे खोपोली, रायगड.
8) संकेत चौधरी, वय 40 वर्ष,गोरेगाव, मुंबई.
9)रोशन शेलार, वय 35 वर्ष, मुंबई
10)विशाल अशोक विश्वकर्मा, वय 23 वर्ष, गोरेगाव, मुंबई
11) निखिल संजय पारकर, वय 18 वर्ष, मुंबई.
12) युसुफ मुनीर खान, वय 13 वर्ष, मुंबई
13) कोमल बाळकृष्ण चिले, वय 15 वर्ष, सांताक्रुज, मुंबई
14) अभिजीत दत्तात्रेय जोशी वय 20 वर्षे, गोरेगाव मुंबई.
16) मोहक दिलीप सालप, वय 18 वर्षे, मुंबई.
17) दिपक विश्वकर्मा, वय २०वर्ष, गोरेगाव, मुंबई
18) सुरेश बाळाराम अरोमुक्कंम, वय १८ वर्ष, गोरेगाव,मुंबई.

खोपोली नगरपालिका हॉस्पिटल मधील जखमींची नावे
१) नम्रत रघुनाथ गावनुक, वय १८ वर्ष, गोरेगाव, मुंबई.
२) चंद्रकांत महादेव गुडेकर, वय 29 वर्ष, गोरेगाव, मुंबई
३) तुषार चंद्रकांत गावडे, वय 22 वर्षे, गोरेगाव, मुंबई
४) हर्ष अर्जुन फाळके, वय 19 वर्ष, विरार.
५) महेश हिरामण म्हात्रे, वय २० वर्षे, गोरेगाव, मुंबई
६) लवकुश रणजीत कुमार प्रजापति, वय 16 वर्ष, गोरेगाव, मुंबई
७) शुभम सुभाष गुडेकर, वय 22 वर्षे, गोरेगाव, मुंबई
८)ओम मनीष कदम, १८वर्ष, गोरेगाव, मुंबई.
९) मुसेफ मोईन खान,वय २१ वर्ष, गोरेगाव, मुंबई

खाजगी रुग्णालय जाकोटिया रुग्णालय खोपोली जखमीची नावे:-
१) सनी ओमप्रकाश राघव, वय २१ वर्ष, खोपोली,रायगड.

खालापूर रुग्णालयात मयत नावे.
१) जुई दिपक सावंत, १८ वर्ष, गोरेगाव, मुबई