जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांनी कणकवली येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.!

104

कणकवली : जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त कणकवली बौद्ध विहार येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी कणकवली तहसीलदार आर. जे. पवार, सामाजिक न्याय विभागाचे अधिकारी उपस्थित होते. संपूर्ण भारतात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी जयंती उत्साहात साजरी होत आहे. सिंधुदुर्गातही विविध सामाजिक उपक्रम त्यांच्या जयंती निमित्त राबवण्यात येत आहेत. तसेच शासनाने देखील त्यांनी केलेले काम समाजापर्यंत पोहोचावे यासाठी विशेष उपक्रम हाती घेतले आहेत.