नरडवे येथील युवती बेपत्ता.!

213

कणकवली : नरडवे गावठणवाडी येथील अर्निका अनिल कांदळगावकर हि १८ वर्षीय युवती ११ एप्रिल सकाळी १०.४५ च्या सुमारास रहात्या घरातून बेपत्ता झाली आहे. याबाबत अनिल चंद्रकांत कांदळगांवकर यांनी फिर्याद दिली आहे. अर्निका कांदळगावकर हिचा वर्णसावळा असुन तिची उंची ५ फुट आहे.

घरातून जाताना तिच्या अंगात लवेंडर कलरचा टॉप, काळ्या रंगाची जीन्स, गळ्यात सोन्याची चैन, कानात सोन्याचे रिंग, सफेद शुज आहेत. या वर्णनाची युवती आढळल्यास कृपया पोलीसांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.