सावंतवाडी : सावंतवाडी येथे 11 तारखेला साहस प्रतिष्ठान सिंधुदुर्ग च्या युवक दिन विवेकानंद जयंती व जिजामाता जयंती निमित्त औचीत्य साधुन आर जे आकाश वाणी केंद्राच्या अनघा मोडक यांचे मौलिक मार्गदर्शनचे आयोजिन केले आहे.
“साहस प्रतिष्ठान सिंधुदुर्ग” संचलित दिव्यांग विकास केंद्र,सावंतवाडी ही संस्था जिल्ह्यातील दिव्यांग मुलांचे पालकांनी एकत्र येवुन स्थापन केली आहे. दिव्यांग व्यक्तींचा सर्वांगीण विकास, न्याय व हक्कासाठी ही संस्था सदैव कार्यरत आहे. त्या निर्मित कु.अनघा मोडक आर.जे.मुंबई आकाशवाणी केंद्र येथे कार्यरत आहे.
( त्या स्वत: १००% अंध आहे) यांचे विचार ऐकण्याची सावंतवाडी येथे 11 तारखेला साहस प्रतिष्ठान सिंधुदुर्ग च्या युवक दिन विवेकानंद जयंती व जिजामाता जयंती निमित्त औचीथ साधुन कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. जगण्याचे गाणे होताना हे विचार घेऊन कु.अनघा मोडक सिंधुदुर्ग जिल्ह्यात,सावंतवाडी येथे, संस्थेच्या प्रेरणादायी कार्यक्रमात बुधवार,दिनांक 11 जानेवारी 2022 रोजी संध्याकाळी पाच ते आठ या वेळेत मोती तलावाकाठी शिवउद्यान सावंतवाडी येथे येत आहे. अनघा मोडक यांचे मौलिक विचार ऐकण्याची सुवर्णसंधी नक्की या! आबाल वृद्धांसाठी व युवकांसाठी शारीरिक आरोग्याप्रमाणे मानसिक आरोग्य महत्त्वाचे आहे आणि मनातील नैराश्य दूर होऊन..वैचारिक,बुद्धीची भूक नक्की भागेल,सकारत्मकता वाढेल असा…आपल्या मुलांनी.कुटुंबातील सर्वांनी आवर्जून पहावा असा प्रेरणादायी कार्यक्रम आहे.सदर कार्यक्रमास उपस्थित राहण्यासाठी “साहस प्रतिष्ठान सिंधुदुर्ग” संचलित दिव्यांग विकास केंद्र,सावंतवाडी च्या संस्थापक अध्यक्षा सौ.रुपाली पाटील व दिव्यांग विकास केंद्र,सावंतवाडी चे सचिव श्री.एन.जी.देसाई,यांनी आवाहन केलेले आहे.





