कणकवली मध्ये ५ एप्रिलला सावरकर गौरव यात्रा | नितेश राणे यांचे सहभागी होण्याचं आवाहन

कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यात कणकवली मतदारसंघांमध्ये 5 एप्रिल रोजी सायंकाळी चार ते सहा या वेळेत सावरकर गौरव यात्रेचा आयोजन करण्यात आला आहे अशी माहिती आमदार नितेश राणे यांनी शिवसेना-भाजप संयुक्त पत्रकार परिषदेत दिली.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात तीनही मतदारसंघांमध्ये सात एप्रिल पर्यंत सावरकर गौरव यात्रेचे नियोजन करण्यात आले असल्याची ही माहिती त्यांनी यावेळी दिली. या सर्व गौरव यात्रांमध्ये सिंधुदुर्ग वासियांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन आमदार नितेश राणे यांनी केले आहे