मालवण : मालवण आचरा येथील पलाश निलेश सरजोशी (वय – १४ ) या मुलाचे उपचारादरम्यान दुःखद निधन झाले. दोन दिवसांपूर्वी सरजोशी यांच्या शेजारच्या बागेला वणवा लागला होता. तो पाहण्यासाठी पलाश गेला असता त्याला तो वणवा पाहून अचानक भीती वाटली आणि चक्कर येऊन तो खाली कोसळला. त्यावेळी त्याच्या डोक्याला मार लागला होता. यानंतर त्याला अधिक उपचारासाठी लाईफ टाईम हॉस्पिटल मध्ये हलविण्यात आले होते.

मात्र आज उपचार सुरू असताना दुःखद निधन झाले. पलाश हा सिंधुदुर्ग ब्राह्मण मंडळाचे माजी जिल्हाध्यक्ष तथा विद्यमान सिंधुदुर्ग ब्राह्मण मंडळ पौरोहित्य समिती जिल्हा प्रमुख व पंचद्रवीड पतसंस्थेचे संचालक निलेश सरजोशी यांचा मुलगा आहे. या दु: खद घटनेने सर्व स्तरातून शोक व्यक्त केला जात आहे.





