पॅन कार्ड-आधार कार्ड लिंक करणे मुदत 30 जून पर्यंत वाढली..!

195

नवी दिल्ली : पॅन कार्ड-आधार कार्ड लिंक करणे मुदत 30 जून पर्यंत वाढली. परमनंट अकाउंट नंबर (PAN) आधार कार्डशी लिंक करण्याची अंतिम मुदत ३० जून २०२३ पर्यंत वाढवण्यात आली आहे, असे वित्त मंत्रालयाने २८ मार्च रोजी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

सध्याची मुदत 31 मार्च रोजी संपुष्टात येण्याच्या काही काळापूर्वी ही मुदतवाढ देण्यात आली. आधारशी लिंक नसलेली पॅन कार्ड 1 जुलैपासून निष्क्रिय होतील, असे वित्त मंत्रालयाने नमूद केले आहे. “अशा PANS विरुद्ध कोणताही परतावा दिला जाणार नाही” असे परिणाम होतील, “ज्या कालावधीत पॅन निष्क्रिय राहतील अशा कालावधीसाठी अशा परताव्यावर व्याज देय होणार नाही”, आणि “टीडीएस आणि टीसीएस जास्त दराने कापले जातील”, असे स्पष्ट करण्यात आले आहे .
आयकर विभागाच्या पोर्टलला भेट देऊन आणि 1,000 रुपये शुल्क भरून पॅन आणि आधार लिंकिंग आता 30 जूनपर्यंत पूर्ण केले जाऊ शकते.