गौरवास्पद…! | प्रा. रमाकांत गावडे यांना राष्ट्रीय शैक्षणिक सेवा गौरव पुरस्कार प्रदान…!

बांदा;गोगटे महाविद्यालयाचे प्रा. रमाकांत सिताराम गावडे यांना राष्ट्रीय शैक्षणिक सेवा गौरव पुरस्कार दिग्गज मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला.

प्रा. गावडे हे गेली सत्तावीस वर्षे महाविद्यालयात ज्ञानदानाचे कार्य करत आहेत. शैक्षणिक क्षेत्रात त्यांनी सावंतवाडी तालुक्यात अनेक समाजपयोगी उपक्रम राबविले आहेत. ग्रामीण भागातील मुलींना हक्काचे शिक्षण मिळावे यासाठी प्राथमिक शाळेतील तब्बल 100 विद्यार्थिनींचे दक्तत घे त्यांचे पालकत्व स्वीकारले आहे.

महाविद्यालयातील अनेक विद्यार्थ्यांना देखील त्यांनी शिष्यवृत्ती मिळवून दिली आहे. शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील योगदानाबाबत इंटिग्रेटेड सोशल वेल्फेअर सोसायटी बेळगाव व नॅशनल रुरल डेव्हलपमेंट फाउंडेशन बेळगाव या संस्थेने त्यांची पुरस्कारासाठी निवड केली आहे. त्यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल समाजाच्या विविध स्तरातून त्यांचं अभिनंदन होत आहे.