देशातील सर्व बँकांची केंद्रीय बँक अर्थात भारतीय रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. रिझर्व्ह बँकेने फार्मासिस्ट या पदासाठी उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत. या भरती प्रक्रियेअंतर्गत एकूण २५ रिक्त पदांची भरती केली जाणार आहे. या पदासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख १० एप्रिल आहे. पात्र उमेदवार आरबीआयच्या अधिकृत वेबसाईटवरून जाऊन या पदासाठी अर्ज करू शकतात. पण ही भरती प्रक्रिया कशी केली जाणार, या पदासाठी शैक्षणिक पात्रता काय आहे आणि वयोमर्यादा किती याची सविस्तर माहिती जाणून घ्या.
शैक्षणिक पात्रता
१) अर्जदारांची शैक्षणिक पात्रता मॅट्रिक किंवा त्याच्या समकक्षपर्यंत शिक्षण पूर्ण असणे आवश्यक आहे.
२) अर्जदाराकडे फार्मसी अधिनियम 1948 अंतर्गत नोंदणीकृत मान्यताप्राप्त विद्यापीठातून फार्मसी विषयातील डिप्लोमाची किमान पात्रता असणे आवश्यक आहे.
३) फार्मसीमध्ये बॅचलर पदवी (बी. फार्म) असलेले अर्जदारही या पदासाठी अर्ज करू शकतात
शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांची सर्वप्रथम बँक मुलाखत घेईल. मुलाखतीसाठी बोलावल्या जाणाऱ्या उमेदवारांची संख्या मर्यादित ठेवण्यासाठी किमान पात्रता मानके इत्यादी वाढवण्याचा अधिकार बँकेकडे आहे. उमेदवारांची सर्व शैक्षणिक योग्यता ( पोस्ट ग्रॅज्युएशन/ डिग्री/ डिप्लोमा/ ) वेगवेगळ्या बँकांपासून डिस्पेन्सरींचं अंतर, पीएसबी/पीएसयू/ सरकारी संघटना/ आरबीआय या सर्वांसंदर्भातील अनुभवाच्या आधारे पुढील फेरीसाठी उमेदवार निवडले जातील. यानंतर त्यांच्या कागदपत्रांची पडताळणी केली जाईल. कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर मेडिकल टेस्ट होईल आणि पुढील प्रक्रिया पार पडले. मात्र या पदांसाठी कोणतीही लेखी परीक्षा घेतली जाणार नाही. पण ही भरती प्रक्रिया कॉन्ट्रॅक्ट बेसवर होणार आहे.





