वैभववाडी : आनंदीबाई रावराणे महाविदयालयातील इंग्रजी विभागप्रमुख प्रा.वंदना चंद्रकांत काकडे यांनी नुकतीच मुंबई विदयापीठाची पीएचडी पदवी संपादन केली आहे.
Environment in Literatur, An Ecocritical study of selected novels of Linda hogan, diane glancy and LeAnne howe या विषयात त्यांनी पीएचडी केली आहे. यासाठी डाॕ.दीपा मिश्रा, उल्हासनगर यांचे मार्गदर्शन लाभले. प्रा.काकडे या सन २००८ पासून इंग्रजी विषयाच्या प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. राष्ट्रीय सेवा योजना, परिक्षा विभाग, महिला विकास कक्ष, व अंतर्गत तक्रार निवारण समिती या विभागाच्या प्रमुख म्हणून काम केले आहे. तसेच विदयालय विकास समिती व इतर विविध समित्यांमध्ये सदस्य म्हणून काम केलेले आहे. नॕक अंतर्गत गुणवत्ता हमी विभागाच्या IQAC समन्वयक म्हणून सलग अकरा वर्षे काम केले आणि या कालावधीत महाविदयालयास पुनर्मूल्यांकनाच्या द्वितीय साईकलमध्ये बी ग्रेड, ( २०१२) व २०२१ मध्ये ए ग्रेड मिळवून देण्यात आले. त्यांना मुंबई विदयापीठाचा उत्कृष्ट महिला शिक्षिका म्हणून राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झालेला आहे. त्यांना मिळालेल्या यशाबद्दल शैक्षणिक क्षेत्रात त्यांचे कौतुक केले जात आहे. महाराणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष व पदाधिकारी, प्रार्चाय, प्राध्यापक सहकारी यांनी अभिनंदन केले.





