तुमचाही २०२४ ला बाजार उठणार | निलेश राणे कोणाला बोलले…?

111

मालवण : ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांचा भाजप प्रदेश सचिव माजी खासदार निलेश राणे यांनी जोरदार समाचार घेतला आहे. विनायक राऊत तुम्ही मोदी लाटेमुळे दोनवेळा निवडून आलात. मी अपक्ष राहून सुद्धा २ लाख ७८ हजारहून अधिक मतं घेतली. आता ठाकरे पण भिकेला लागले आणि तुमचाही २०२४ ला बाजार उठणार. असा थेट प्रहार निलेश राणे यांनी केला आहे. खासदार विनायक राऊत यांनी एका कार्यक्रमात निलेश राणे यांच्यावर टीका केली होती. त्या टीकेचा समाचार घेत निलेश राणे यांनी ट्विट करत ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांच्यासह ठाकरे गटावर जोरदार शाब्दिक हल्ला चढवला.