गोवा : म्हादेई वन्यजीव अभयारण्य, मोर्लेम आणि कोर्टालिम येथे आगीसह गोव्यातील अनेक ठिकाणी घनदाट जंगलात वणवे पेटल्याची नोंद नागरी अधिकाऱ्यांनी नोंदवली. जिल्हा प्रशासनाच्या विनंतीवरून, भारतीय नौदलाने आग आटोक्यात आणण्यासाठी आपली अग्निशमन यंत्रणा तैनात केली. वनक्षेत्राचे हवाई सर्वेक्षण करून आगीची स्थाने निश्चित करण्यासाठी डॉर्नियर विमानांचा वापर करण्यात आला . त्यानंतर कोची आणि मुंबई येथील नौदल तुकड्यांमधून अग्निशमन उपकरणे आणण्यात आली आणि नौदलाच्या सीकिंग विमानाने आग विझवण्यासाठी विविध उपाययोजना हाती घेतल्या .
हेलिकॉप्टरने 08 मार्च 23 रोजी अनेक मोहिमा केल्या आणि आगबाधित भागांवर 26 वेळा उड्डाणे करून म्हादेई, कोर्टालिम आणि मोर्लेम येथे सुमारे 17 टन पाण्याची फवारणी केली. ह्या जटिल मोहिमेसाठी जवळच्या जलाशयातून पाणी उचलणे आणि दुर्गम भागातील आग प्रभावित क्षेत्रावर सोडणे आवश्यक होते. ते कठीण काम भारतीय नौदलाच्या पथकाने अथक परिश्रमाने पूर्ण केले .
या ऑपरेशनसाठी हेलिकॉप्टरद्वारे वापरलेले स्पेशल गियर LAALDE (लार्ज एरिया एरियल लिक्विड डिस्पर्शन इक्विपमेंट) राज्य वन विभागाकडून माहिती मिळाल्यानंतर तातडीने मुंबई आणि कोची येथून नौदलाने मागवले. नौदलाची हेलिकॉप्टर 07 मार्च 23 रोजी पहाटेपासून राज्य प्रशासन अधिकारी आणि वन अधिकार्यांच्या समन्वयाने या ऑपरेशन्स करत आहेत. 09 मार्च 23 रोजी सीकिंग हेलिकॉप्टरद्वारे तीन उड्डाणही केले गेले. भारतीय वायुदलाने देखील एमआय-17 हेलिकॉप्टर ह्या अग्निशमन मोहिमेत तैनात केली आहेत .





