पुणे : मामासाहेब माहूर कुस्ती संकुलनातील पैलवान स्वप्नील पाडाळे महाराष्ट्र चॅम्पियन याचे बुधवारी आकस्मिक निधन झाले. त्यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. बुधवारी सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास पुण्याच्या मारुंजी येथील कुस्तीच्या तालमीत ही दुर्दैवी घटना घडली.
उपलब्ध माहितीनुसार स्वप्निल हा नेहमीप्रमाणे सरावासाठी मारुंजी येथे असलेल्या तालमीत आला होता. कुस्तीसाठी सराव करताना पैलवानांना सपाट्या मारायच्या असल्यामुळे तो देखील तशाच स्वरूपाचा व्यायाम करत होता. व्यायाम करताना अचानक त्याला हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि अचानकपणे तो खाली कोसळला. तो अचानक खाली कोसळल्याचे पाहताच तालमीत उपस्थित असलेल्या अन्य मल्ल्याने तात्काळ रुग्णालयात दाखल केले. मात्र त्याआधी त्याचा मृत्यू झाला होता .
स्वप्नीलने कात्रज येथे नुकत्याच झालेल्या एनआयएस कुस्ती कोच परीक्षेत स्वप्नीलने राज्यात प्रथम क्रमांक मिळवला होता. तसेच तो महाराष्ट्र चॅम्पियन देखील होता. सध्या तो युवा पैलवानांना कुस्तीचे प्रशिक्षण देण्याचे काम करत होता. तो स्वतः युवा पैलवान असून परिचित होता. तो मूळचा मुळशी तालुक्यातील महाळुंगे येथील रहिवासी असल्याचे समजते.





