मुंबई : बॉलिवूडसाठी आणि कलाकारांसाठी आजची सकाळ एक दुःखद बातमी घेऊन उजाडली आहे. प्रसिद्ध अभिनेते आणि निर्माते, दिग्दर्शक सतीश कौशिक यांचे निधन झाले आहे. अभिनेते अनुपम खेर यांनी ट्विट करून ही दुःखद बातमी दिली आहे. सतीश कौशिक यांनी अनेक चित्रपटांमध्ये उत्तम भूमिका केल्या.
सतीश कौशिक यांचे पूर्ण नाव सतीश चंद्र कौशिक असे होते. त्यांच्या जन्म १३ एप्रिल १९५६ मध्ये झाला. ते उत्तम अभिनेत्यासह निर्माते आणि दिग्दर्शक आणि विनोदी कलाकारही होते. त्यांची मिस्टर इंडिया मधील कॅलेंडर ही भूमिका लोकप्रिय झाली होती महाराष्ट्र माझा तर्फे सतीश कौशिक यांना भावपूर्ण श्रद्धांजली.





