देवगड : श्री देव चव्हाटा मांडकरी देवालय मिठमुंबरी बागवडी येथे सुरू असलेल्या वार्षिक शिमगोत्सव लळीताच्या कार्यक्रमाचे औचित्य साधून बागवाडी उत्कर्ष मंडळ मिठमुंबरी यांच्या वतीने मंगळवार १४ मार्च २०२३ जिल्हास्तरीय भव्य रेकॉर्ड डान्स स्पर्धेचे आयोजन श्री देव चव्हाटा मांडकरी देवालय मिठमुंबरी बागवाडी येथे रात्री ११ वाजता आयोजित करण्यात आल्या आहेत.
स्पर्धेसाठी प्रथम क्रमांक ८०००, द्वितीय क्रमांक ५०००,तृतीय क्रमांक ३०००, तर उत्तेजनार्थ १००० व सन्मानचिन्ह
देण्यात येणार आहे. तरी इच्छुक स्पर्धकांनी आपली नावे १०मार्च २०२३ पर्यंत आयोजकांकडे नोंदवून आपला सहभाग निश्चित करावा अधिक माहितीसाठी उमेश तारी ९४२०७४१७१८, आप्पा नेसवणकर,प्रमोद आडकर यांच्याशी संपर्क साधावा. असे आवाहन उत्कर्ष मंडळ मिठमुंबरी बागवाडीच्या वतीने करण्यात आले आहे.




