असलदेत गव्यारेड्यांचा वावर…!

कणकवली : तालुक्यात मागील काही महिन्यापासून जंगली जनावरांचा वावर सुरू आहे. पावसाळ्यात आबाईक ठिकाणी मोठेच्या मोठे कळप देखील काही वेळा पाहायला मिळाले. असे असताना कणकवली तालुक्यातील असलदे गावात जंगली गवा रेड्यांचा वावर मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. ग्रामपंचायत पाण्याची टाकी परिसरात सायंकाळी ६:४० वाजता ग्रामपंचायत कर्मचारी श्री. घाडी यांना दिसून आला.

सध्या काजू बागायतदार शेतकरी बागांमध्ये काम करतात. त्यामुळे शेतकरी चिंतेत पडले आहेत. याबाबत वन विभागाने तातडीने उपाययोजना करून गवा रेड्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.